Pune Rain Update:'मुळशीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस'; धरण ९९ टक्‍के भरले, आत्तापर्यंत एकुण ७४२८ मिमी पाऊस

Record-Breaking Rain in Mulshi: अतिवृष्‍टीमुळे मुळशी धरणाच्‍या पाणीसाठयात प्रचंड मोठी वाढ झाली आहे. मुळशी धरण ९९ टक्‍के भरले आहे. धरणात सुमारे २० टीएमसी एवढा साठा झाला आहे. धरणातील पाणीसाठयावर नियंत्रण ठेवण्‍यासाठी विसर्ग वाढवत मुठा नदीत ३१००० क्‍युसेक्‍स वेगाने विसर्ग करण्‍यात येत आहे.
Record-Breaking Rain in Mulshi; Dam Now 99% Full
Record-Breaking Rain in Mulshi; Dam Now 99% FullSakal
Updated on

माले: मुळशी धरण परिसरात पावसाने अक्षरशः धुमाकुळ घातला आहे. ताम्हिणी येथे गेल्‍या चोवीस तासांत तब्‍बल ५७५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर या हंगामात आत्‍तापर्यंत ७४२८ मिलीमीटर एवढा मोठा पाऊस झाला आहे. हा गेल्‍या काही वर्षांतील रेकॉर्डब्रेक पाऊस आहे. मुळशी धरण परिसरात दावडी ४२८, शिरगाव ४३०, आंबवणे ३३८ असा पाऊस नोंदला गेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com