बायपासवर बोगद्याचा पर्याय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

पुणे - चांदणी चौकातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मुंबई-बंगळूर बायपास मार्गावर वारजे ते बावधन दरम्यान बोगदा करावा, असा पर्याय समोर आला आहे. भविष्यातील गरज ओळखून महापालिका आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने या पर्यायाचा विचार करणे आवश्‍यक आहे.

पुणे - चांदणी चौकातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मुंबई-बंगळूर बायपास मार्गावर वारजे ते बावधन दरम्यान बोगदा करावा, असा पर्याय समोर आला आहे. भविष्यातील गरज ओळखून महापालिका आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने या पर्यायाचा विचार करणे आवश्‍यक आहे.

या चौकात पाषाण, कोथरूड, पौड रस्ता (मुळशी), राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि बायपास असे मार्ग या चौकात येतात. या चौकातील वाहतूक कोंडी आणि अपघात हा चिंतेचा विषय ठरला आहे. या चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने या ठिकाणी उड्डाण पूल, सब-वे, सेवा रस्ता करण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पाचे गेल्या वर्षी उद्‌घाटन झाले. या प्रकल्पासाठी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १४ हेक्‍टर जागा लागणार आहे. त्यापैकी सुमारे चार हेक्‍टर जमीन महापालिकेने ताब्यात घेतली आहे. या प्रकल्पातील बाधित सदनिकाधारकांना रेडीरेकनरच्या दुप्पट दराने नुकसानभरपाई दिली जात आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ४२० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

हा प्रकल्प महापालिका आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण राबवित असून, वास्तूविशारद आर्किटेक्‍ट प्रदीप गुप्ते यांनी एक पर्याय मांडला आहे. बायपास महार्गावर चांदणी चौक परिसरातील टेकडीखाली वारजे ते बावधन हा साधारणपणे एक ते दीड किलोमीटर लांबीचा बोगदा तयार केला तर या चौकातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होऊ शकते. बायपासवरील वाहतूक चांदणी चौकात न येता थेट बावधनच्या दिशेने जातील, असा दावा गुप्ते यांनी केला आहे. या पर्यायाचा विचार महापालिका आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

बोगद्यामुळे काय होईल 
 बायपासवरील वाहतूक सरळ रेषेत होईल आणि अंतर कमी होईल. 
 वाहतूक कोंडी न करता काम करता येईल
 जमीन ताब्यात घेण्याचा 
प्रश्‍न येणार नाही
 एकावर एक उड्डाण पूल बांधण्याची आवश्‍यकता 
राहणार नाही

Web Title: mumbai banglore bypass highway tunnel chandani chowk