

Pune Solapur Route Set for Vande Bharat Sleeper Trial Pune Bengaluru Travel Time May Drop to Just 13 Hours
sakal
पुणे: बहुचर्चित मुंबई- बंगळूर ‘वंदे भारत स्लीपर’ एक्सप्रेसचे दोन रेक बंगळूरमध्ये दाखल झाले आहेत. या रेल्वेची लवकरच पुणे, सोलापूरमार्गे चाचणी होणार आहे. या मार्गावर ताशी १३० किलोमीटर वेगाने धावून वेगाची चाचणी घेतली जाईल. येत्या एक ते दोन आठवड्यात चाचणी पूर्ण होऊन लवकरच प्रवाशांच्या सेवेत ‘वंदे भारत स्लीपर’ एक्सप्रेस धावणार आहे. ही महाराष्ट्रातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर’ एक्सप्रेस असेल.