मुंबई अंधारात गेली की काळजी घेता, उर्वरीत महाराष्ट्राचे काय?

मुंबई अंधारात गेली की काळजी घेता, उर्वरीत महाराष्ट्राचे काय?

पुणे - मुंबईत तांत्रिक बिघाडामुळे काही तास वीजपुरवठा खंडित झाला आणि सगळ्या देशाला शॉक बसला. त्याची तातडीने दखल घेत परत अशी घटना घडू नये म्हणून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. मात्र उर्वरित महाराष्ट्रात वर्षानुवर्षे दर महिन्याला तांत्रिक बिघाडामुळे हजारो तास लक्षावधी ग्राहकांना अंधारात बसावे लागत आहे. त्यावर कधी उपाययोजना करणार, असा सवाल सजग नागरीक मंचाने मुख्यमंत्री यांना केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

महावितरणच्या संकेतस्थळावर ऑक्‍टोबर आणि डिसेंबर 19 या महिन्यातील संपूर्ण महाराष्ट्रात किती वेळा वीजपुरवठा खंडीत झाला, हे लक्षात येते. ऑक्‍टोबर 2019 मध्ये एका महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात तांत्रिक बिघाडाच्या 17 हजार 745 घटना घडल्या. ज्यामधे राज्यातील चार कोटी दहा लाख 28 हजार नागरिकांना 2 हजार 176 तास अंधारात बसावे लागले. महाराष्ट्रात महावितरणला सर्वात जास्त महसूल मिळवून देणाऱ्या देशातील पहिली स्मार्ट सिटी म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या पुणे झोनची अवस्था काही वेगळी नाही. ऑक्‍टोबर 2019 मध्ये पुण्यामध्ये तांत्रिक बिघाडाच्या 1378 घटना घडल्या. ज्यामध्ये पुणेकरांना 1 हजार 687 तास अंधारात बसावे लागले. डिसेंबर 2019 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात तांत्रिक बिघाडाच्या 10 हजार 994 घटना घडल्या.

ज्यामधे राज्यातील दोन कोटी 78 लाख 12 हजाराहून अधिक नागरिकांना एकूण 15 हजार 167 तास अंधारात बसावे लागले. महाराष्ट्रात महावितरणला सर्वात जास्त महसूल मिळवून देणाऱ्या देशातील पहिली स्मार्ट सिटी म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या पुणे झोनची अवस्था काही वेगळी नाही. 

महावितरणच्या संकेतस्थळावर गेल्या तीन वर्षांचे चार्ट उपलब्ध आहेत. ते पाहता तांत्रिक बिघाडामुळे होणारा अंधार उर्वरित महाराष्ट्राच्या पाचवीलाच पुजलेला असल्याचे स्पष्ट दिसून येते. या व्यतिरिक्त देखभाल दुरुस्तीसाठी आठवड्यातून एक दिवस ( पुण्यात गुरुवारी) काही तासांचा नियोजनबद्ध अंधार आणि ग्रामीण भागातील भारनियमनामुळे होणारा अंधार वेगळाच. त्यामुळे उर्वरीत महाराष्ट्रातील जनतेची पण तांत्रिक बिघाडामुळे होणाऱ्या अंधारापासून सुटका करावी, अशी मागणी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पत्रात केली आहे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com