Uruli Kanchan News : खासगी सावकार स्वप्नील कांचन प्रकरणी मुंबई हायकोर्टाचा दणका

घेतलेले कर्ज व्याजासह परत करूनही जीवे मारण्याची धमकी देवून बळजबरीने १८ गुंटे जमिन लाटणाऱ्याला उच्च न्यायालयाने दणका दिला.
mumbai High Court
mumbai High Courtsakal

उरुळी कांचन - घेतलेले कर्ज व्याजासह परत करूनही जीवे मारण्याची धमकी देवून बळजबरीने १८ गुंटे जमिन लाटणाऱ्याला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. या प्रकरणी न्यायालयाने एकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. दरम्यान, या प्रकरणामध्ये लोणी काळभोर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तर इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्रशांत विलास गोते (रा. बिवरी, ता. हवेली, जि. पुणे ) असे अटकपूर्व जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. तर स्वप्निल राजाराम कांचन (वय-३०, रा. परिवर्तन सोसायटी, आश्रम रोड, उरुळी कांचन, ता. हवेली) असे सावकारी विरोधी कायद्यांतर्गत पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विकास रामदास कटके (वय-३०, रा. अष्टापुर, ता. हवेली) यांनी फिर्यादी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कटके यांनी स्वप्नील कांचन याच्याकडून २०१९ मध्ये ६ लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यानंतर कटके यांनी व्याजासह ४ लाख ६० हजार रुपये कांचनला दिले. मात्र, त्यानंतरही कांचन, गोते व त्यांचे इतर दोन साथीदार हे कर्जाच्या रकमेऐवजी कटके यांची शिंदवणे, ता. हवेली येथील जमीन देण्यासाठी कटके व त्यांच्या कुटुंबातील लोकांना त्रास देवू लागले. त्यानंतर त्यांनी जिवे मारण्याची धमकी देवून कटके यांची शिंदवणे येथील १८ गुंठे जमीन बळजबरीने गोते‌ यांच्या नावावर केली.

या प्रकारानंतर कटके यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार पोलिसांनी खासगी सावकारी विरोधी कायद्यांतर्गत स्वप्निल कांचनला अटक करून इतरांविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर प्रशांत गोते याने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सारंग कोतवाल यांच्या न्यालायलाने त्याचा अटकपूर्व जामिन फेटाळला.

कटके यांची फसवणूकच झाल्याचे हायकोर्टात निष्पन्न

विकास कटके व त्यांच्या कुटुंबांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून बळजबरीने खरेदीखत करून घेण्यात आले होते. हे हायकोर्टाच्या निदर्शनास आले परंतु, प्रशांत गोते हा कोणतेही सबळ पुरावे देण्यास असमर्थ ठरल्यामुळे कटके यांची फसवणूकच झाल्याचे निष्पन्न झाल्याने हायकोर्टाने प्रशांत गोते यांचा जामीन नाकारला. आता हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी प्रशांत गोते याने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com