
पुणे: देखावे पाहण्यासाठी पुण्याच्या मध्यवर्ती भागात येणाऱ्या भाविकांचा प्रवास मेट्रोमुळे सुसह्य झाला आहे. वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या पुणेकरांनी रविवारी सकाळपासूनच मेट्रोच्या विविध स्थानकांवर गर्दी केली होती. सायंकाळी सहानंतर प्रवाशांच्या संख्येत वाढ होत गेली. रविवारी रात्री दहाच्या आकडेवारीनुसार मेट्रोच्या दोन्ही मार्गांवर मिळून दोन लाख ८४ हजार २८४ प्रवाशांनी प्रवास केला. मंडई स्थानकावर ४४ हजार ७९१ प्रवाशांची संख्या होती.