मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग उद्या राहणार दोन तास बंद

express way
express way

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग उद्या (बुधवार) दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

द्रुतगती मार्गावर उद्या दुपारी 12 ते 2 दरम्यान हा ब्लॉक असणार आहे. ओव्हरग्रेड गँन्ट्री बसवण्यासाठी हा बंद ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. खालापूर टोलनाक्यापासून ही वाहतूक पुण्याकडे वळवण्यात येईल. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर दोन तासांसाठी हा बंद असेल.

द्रुतगती मार्गावर गेल्या महिन्यातही दोन तासांसाठी ब्लॉक घेण्यात आला होता. या मार्गावर आतापर्यंत अनेक प्रवाशांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. या मार्गावर लेनची शिस्त मोडण्याच्या घटना सर्रास घडतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com