
Mumbai: ‘एमएसआरडीसी’कडून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर डोंगरगाव - कुसगांवनजीक मुंबई वाहिनीवर पूल बांधण्याचे काम सुरू आहे. त्याचे गर्डर बसवण्यासाठी बुधवार, २१ जानेवारीपासून शनिवारपर्यंत तीन दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे.
त्यामुळे या कालावधीत दुपारी १२ ते ३ या वेळेत मुंबईहून पुण्याकडे जाणारी एक्स्प्रेस वेवरील वाहतूक अन्य मार्गाने वळवली जाणार आहे.