

Mumbai–Pune Expressway Chaos: 15-Hour Traffic Jam Sparks Viral Outrage Over Infrastructure Failures
esakal
मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या द्रुतगती महामार्गावर सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक समस्यांमुळे प्रवाशांची अस्वस्थता वाढत आहे. मंगळवारी (३ फेब्रुवारी) संध्याकाळी खोपोली परिसरात आडोशी बोगद्याजवळ एका अत्यंत ज्वलनशील गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात झाला, ज्यामुळे या मार्गावर १५ तासांपेक्षा अधिक काळ प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली.