

Mumbai Pune Expressway gas tanker accident investigation
sakal
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील गॅस टॅंकरच्या अपघाताची घटना नेहमीपेक्षा खूपच वेगळी होती. एरवी अपघात झाल्यास तत्काळ मदत पोहोचते; या वेळी मात्र त्यावर तज्ज्ञांच्या पथकाशिवाय काहीच करता येत नव्हते. या घटनेचा अहवाल तयार करून चौकशी केली जाईल. मात्र भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी आवश्यक काळजी घेतली जाईल, पर्यायी व्यवस्थाही उभा केली जाईल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गुरुवारी सांगितले.