Mumbai Pune Expressway

Mumbai Pune Expressway

esakal

कोट्यवधींचा टोल, पण सुरक्षा शून्य? टँकरचालकाचा निष्काळजीपणा अन् मुंबई-पुणे एक्सप्रेस वे 'जाम'; आपत्कालीन यंत्रणेची मोठी कसोटी

What Happened on Mumbai Pune Expressway in Khalapur : खालापूरजवळ मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रोपेलिन गॅस टँकर उलटल्याने २३ तास गॅस गळती सुरू होती. प्रवाशांचे हाल झाले, सुरक्षा यंत्रणांची कसोटी लागली.
Published on

खालापूर : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी (Mumbai Pune Expressway) सायंकाळी पुण्याहून मुंबईकडे येणारा ज्वालाग्राही प्रोपेलिन गॅसने भरलेला टँकर आडोशी हद्दीत उटल्यानंतर झालेल्या गॅस गळतीने आपत्कालीन यंत्रणा, महामार्गावरील सुरक्षा व्यवस्था आणि प्रवाशांची मोठी कसोटी पाहिली. तब्बल २३ तास गळती आटोक्यात आणण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांदरम्यान प्रवाशांचे प्रचंड हाल झाले, तर द्रुतगती मार्गावरील यंत्रणांची मर्यादा पुन्हा एकदा समोर आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com