Mumbai Pune Expressway Traffic : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडीमुळे नोकरदार व व्यावसायिकांची त्रासदायक प्रतीक्षा

Pune Mumbai expressway traffic : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर मंगळवारी आणि बुधवारी मोठी वाहतूक कोंडी, शेकडो प्रवासी अडकले. आयटी, उद्योग, सेवा क्षेत्रातील नोकरदार वेळेत पोहोचू शकले नाहीत. कार्यालयीन कामावर परिणाम, महत्त्वाच्या बैठक रद्द, प्रवाशांना अनेक तास प्रतीक्षा करावी लागली.
Pune Mumbai expressway traffic

Pune Mumbai expressway traffic

sakal

Updated on

पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मंगळवारी व बुधवारी झालेल्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या कोंडीत अडकलेल्या शेकडो प्रवाशांना अनेक तास प्रतीक्षा करावी लागली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरदार, व्यावसायिक आणि उद्योजक अडकून पडले. वेळेत अपेक्षित ठिकाणी पोहोचता न आल्याने त्यांच्या कामकाजावर थेट परिणाम झाला.

पुणे आणि मुंबईदरम्यान रोज कामानिमित्त ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आयटी, उद्योग, व्यापार तसेच सेवा क्षेत्रातील अनेक कर्मचारी दररोज एक्स्प्रेस वेचा वापर करतात. मात्र अचानक झालेल्या वाहतूक कोंडीमुळे कार्यालयीन वेळापत्रक कोलमडले. अनेकांना महत्त्वाच्या बैठका रद्द कराव्या लागल्या, तर काहींना उशिरा कार्यालयात हजेरी लावावी लागली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com