

Mumbai Pune Expressway Traffic
sakal
लोणावळा : ‘वीकेंड’ आणि सुट्ट्यांचा योग आल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाट परिसरात शनिवारी (ता. २०) सकाळपासून वाहनांच्या रांगा लागल्या. पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांमुळे तसेच खासगी वाहने, बस व अवजड वाहनांची संख्या वाढल्याने आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिटदरम्यान वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते.