

Mumbai Pune Expressway
Esakal
Mumbai Pune Expressway Traffic: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ उलटलेल्या गॅस टँकरमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी (3 फेब्रुवारी) संध्याकाळी झालेल्या अपघातानंतर 16 तास उलटूनही गॅस गळती थांबलेली नसून, अग्नीशमन दल, बचाव व मदत पथक आणि NDRFच्या टीम घटनास्थळी तैनात आहेत. टॅंकर हलवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र मागील १५ तासांपासून हजारो प्रवासी या वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. या वाहतुकोंडीमुळे अनेकांना पश्चातापाला सामोरे जावे लागले आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला असून त्यांनी सोशल मीडियात तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.