

Morning Traffic Snarl Hits Pune Direction on Expressway
Esakal
भाऊ म्हाळसकर, लोणावळा, ता.१९: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गुरुवारी पहाटेपासून पुन्हा एकदा भीषण वाहतूक कोंडी झालीय. बोरघाट परिसरात आज पहाटेपासून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. यामुळे एक्सप्रेवेवर वाहतूक संथ गतीने सुरू आहे. सकाळपासून पुण्याच्या दिशेने टाटा कॅम्प ते अमृतांजन पॉईंट पुढे सुमारे दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. ( Traffic Jam on Pune Lane of Mumbai Pune Expressway )