

India’s Widest Tunnel on Mumbai–Pune Expressway in Final Stage, Opening Soon
Sakal
-निलेश खरे
लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रवाशांचा वेळ वाचवणारा आणि घाटातील वळणदार रस्त्याला पर्याय ठरणारा बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आता पूर्णत्वाकडे सरकला आहे. येत्या एक मे पर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार असून, सकाळ माध्यम समूहाने नुकतीच या प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे अंतर कापण्यासाठी आता प्रवाशांचे २० ते २५ मिनिटे वाचणार आहेत.