Pune News : मुंढवा नदीपुलावर अपघाताची मालिका सुरूच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune News : मुंढवा नदीपुलावर अपघाताची मालिका सुरूच

Pune News : मुंढवा नदीपुलावर अपघाताची मालिका सुरूच

मुंढवा : येथील नदीच्या पुलावर वाहतूक कोंडी फोडण्यासाठी केलेल्या एकेरी वाहतूकीतून विरूध्द दिशेने भरधाव वेगाने वाहनांची सर्रास ये-जा सुरू असल्याने, मुंढवा येथील नदी पुलावर किरकोळ अपघाताची मालिका सुरू आहे.

हेही वाचा: अंबाला कारागृहाच्या मातीपासून बनणार नथुराम गोडसेचा पुतळा

येथे मोठा अपघात होवून कोणाच्या मृत्यूची वाट न पाहता, नियम मोडणाऱ्या चालकांना वाहतुक पोलिसांनी शिस्त लावून निरपराधांचे प्राण वाचवावे असे वृत्त दै. सकाळने प्रसिध्द केले होते. त्याकडे वाहतुक पोलिसांनी दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकी व टेम्पोचा अपघात झाला.

हेही वाचा: 'मोदी सरकारला चीनकडून अपमानित व्हायला आवडते, त्याची सवय झालीय'

त्यात दोन्ही वाहनांचे नुकसान होवून दुचाकी चालक किरकोळ जखमी झाला आहे. मुंढवा मुळा-मुठा पुलावरील खराडीच्या दिशेकडून एकेरी वाहतुकीत वाहने घुसविण्याच्या समस्येने अनेक दिवसांपासून गंभीर रूप धारण केले आहे. त्यामुळे नियम पाळणाऱ्या वाहनधारकांना किरकोळ अपघाताला सामोरे जावे लागत आहे.

त्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍नही जटिल झाला आहे. त्यामुळे येथील वाहतूक व्यवस्थेचे नियमन करण्यासाठी वाहतुक पोलिस अधिका-यांनी पुलाच्या दोन्ही बाजूला पोलिस नेमून, वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

loading image
go to top