

mundhwa land case
esakal
Pune Latest News: बोपोडी येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल असलेले तत्कालीन तहसीलदार सूर्यकांत येवले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील न्यायालयाने फेटाळला. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांनी हा आदेश दिला. या जमिनीबाबत येवले यांनी तत्कालीन महसूलमंत्री आणि अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असा युक्तिवाद सरकार पक्षाकडून करण्यात आला.