

JCB accident at Mundhwa kills municipal worker, workplace safety, Rahul Gosavi
sakal
मुंढवा : कोरेगाव पार्क येथे महापालिकेचे काम सुरू असताना जेसीबीचा फाळका डोक्याला लागल्याने एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राहुल अनिल गोसावी (वय ३८, रा. येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.