

Allegations of Land Scam in Mundhwa Involving Parth Pawar
Sakal
पुणे/हिंजवडी : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार, मुद्रांक शुल्क विभागाचे जिल्हा सहनिबंधक संतोष हिंगणे यांच्यासह संबंधित इतर अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अधिकार कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी केली. पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.