कुचकामी प्रशासन; नागरिकांचे हाल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

पिंपरी - नागरिकांना कराच्या बदल्यात चांगल्या सेवा वेळेत देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र, कुचकामी प्रशासनामुळे योग्य सेवा मिळत नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्याचाच प्रत्यय गुरुवारी झालेल्या पावसामुळे आला. महापालिकेच्या विकासकामांचा बुरखा यामुळे फाटला आहे.

पिंपरी - नागरिकांना कराच्या बदल्यात चांगल्या सेवा वेळेत देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र, कुचकामी प्रशासनामुळे योग्य सेवा मिळत नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्याचाच प्रत्यय गुरुवारी झालेल्या पावसामुळे आला. महापालिकेच्या विकासकामांचा बुरखा यामुळे फाटला आहे.

थेरगावातील ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात बाहेर तळ्याचे स्वरूप आले होते. शेजारच्या ग्रीन स्वीट सोसायटीच्या वाहनतळातील व रस्त्यावरील वाहने पाण्यात बुडाली, शेजारील दुकानांत व घरांतही पाणी शिरले. पावसाळी गटारीची निकृष्ट दर्जाची झालेली कामे, नैसर्गिक नाल्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे ही परिस्थिती ओढावल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शेवटी जेसीबीच्या साहाय्याने नाल्यावरील बांधकाम तोडले. त्यानंतर पाणी ओसरले. दत्त कॉलनीतील घरांत पाणी शिरल्याने अनेकांचा संसार पाण्यात तरंगत होता. दरम्यान, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी परिसराची गुरुवारी रात्री पाहणी करून तातडीने योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या, असे उपस्थित लोकप्रतिनिधींनी सांगितले. शुक्रवारी सकाळी याठिकाणी पाण्यात बुडालेली सुमारे ४० वाहने क्रेनने गॅरेजमध्ये दुरुस्तीस नेली, असे विश्‍वनाथ बारणे यांनी कळवले.  पावसाळी व सांडपाणी गटारांची कामे होत असताना आर्थिक हितसंबंधामुळे महापालिकेचे अभियंते प्रत्यक्ष कामाची पहाणी करत नाहीत. त्यामुळे लाखो रुपये खर्चूनही कामे व्यवस्थित होत नाहीत.

अगोदर झालेल्या चुकीच्या कामांमुळे थेरगावात ही परिस्थिती निर्माण झाली. मात्र, यापुढे होणाऱ्या प्रत्येक कामात बारकाईने लक्ष दिले जाणार आहे. 
- कैलास बारणे, नगरसेवक

‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाजवळील पावसाळी गटाराच्या चेंबरमध्ये पाणी मावत नसल्याने ते परिसरात साचले. चेंबर तोडल्यानंतर पाणी ओसरले. त्या ठिकाणी लोंखडी जाळी टाकली जाणार आहे. धनगरबाबा परिसरातील चेंबरच्या छिद्रावर कचरा जमा झाल्याने पाणी साचले. 
- देवन्ना गट्टूवार, कार्यकारी अभियंता, जलनिस्सारण विभाग

Web Title: municipal administration service issue public