पालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीत मंजूर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

तरतुदींचा विचार करून उपसूचनांवर कार्यवाहीची सावळे यांची सूचना

पिंपरी - महापालिकेच्या २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या चार हजार ८०५ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला स्थायी समिती सभेने मंगळवारी मंजुरी दिली. कामांची आवश्‍यकता तपासून आणि उपलब्ध तरतुदींचा विचार करून अर्थसंकल्पासाठी मांडलेल्या उपसूचनांवर पुढील कार्यवाही करावी, अशी सूचना स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी दिल्या.

महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी १८ एप्रिल रोजी स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर केला होता. मूळ तीन हजार ४८ कोटींचा आणि जेएनएनयूआरएम व केंद्र सरकारच्या इतर योजनांसह चार हजार ८०५ कोटींचा अर्थसंकल्प आहे. त्यामध्ये कोणतीही वाढ न करता स्थायी समिती सभेने मंजूर केला. दरवर्षी महापालिका कामगिरीवर आधारित अर्थसंकल्प तयार करते. प्रत्यक्षात ५० ते ६० टक्के रक्कम विकासकामांवर खर्च केले जाते. यंदाच्या अर्थसंकल्पापासून आवश्‍यक कामांसाठीच तरतुदीची सूचना अधिकाऱ्यांना केल्याचे सावळे यांनी सांगितले.

शहरातील बेरोजगारांसाठी महापालिकेमार्फत रोजगार मेळावा आयोजित करण्यासाठी १५ लाख, पीएमपीएमएलसाठी २१ कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्याची उपसूचना मांडली आहे. तसेच भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्याची योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्मार्ट सिटी प्रकल्प, मेट्रो या महत्त्वाच्या योजनांसाठी अर्थसंकल्पात 
तरतूद रकमेतील एक रुपयाचे वर्गीकरण केले जाणार नसल्याचे स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी सांगितले. 

महत्त्वपूर्ण तरतुदी...  
लोणावळा-पुणे लोहमार्गाच्या तिसऱ्या ट्रॅकसाठी (लोकल) २५ लाखांची तरतूद 
मंजूरपेक्षा जास्त बांधकामावरील दंड कोणाकडून व किती वसूल केला हे समजणार 
सीएसआर फंड, संशोधन व विकास आणि अंध-अपंग मध्यवर्ती केंद्रासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष

Web Title: municipal budget standing committee sanction