
पुणे : पुण्यातील जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर व डॉक्टरेतर कर्मचाऱ्यांच्या सहा महिन्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी महापालिकेने फाईव्ह स्टार व डिलक्स हॉटेलचे दर मागविले आहेत. त्यावर पंचतारांकित हॉटेलची अट का, असा आक्षेप स्वयंसेवी संस्थांनी घेतला आहे. तर, पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मागणी केल्यानुसार डॉक्टरांची व्यवस्था करण्यात येत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
- मुख्यमंत्री जरा डोळे उघडा अन् मातोश्रीच्या बाहेर पडा..राजू शेटी यांची टीका
पीएमआरडीए, महापालिकेने शिवाजीनगरमधील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात जंबो कोविड केअर सेंटर उभारले आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याचे 25 ऑगस्ट रोजी उद्घाटन झाले. आठशे बेडच्या या रुग्णालयात सहाशे ऑक्सिजन व दोनशे "आयसीयू'चे बेड आहेत. बुधवारपासून या रुग्णालयाला प्रारंभ झाला आहे. या रुग्णालयातील डॉक्टर व डॉक्टरेतर कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी महापालिकेने विविध वृत्तपत्रांत जाहिरात दिली. त्यात या डॉक्टरांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी फाईव्ह, फोर किंवा थ्री स्टार अथवा डिलक्स हॉटेलचे दर मागविले आहेत. तेथे डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे.
डॉक्टरांसाठी महापालिकेने अनेक हॉटेल्स ताब्यात घेतलेली आहेत. तसेच त्यांची व्यवस्था साध्या हॉटेल्समध्येही होऊ शकते. त्यासाठी फाईव्ह स्टार हॉटेलची गरज काय आहे, असा प्रश्न "आपले पुणे'चे उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे आदींनी उपस्थित केला आहे. या बाबत महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, "डॉक्टर, कर्मचाऱ्यांसाठी पंचतारांकित हॉटेलमधील निवास व्यवस्था आणि जेवण, नाष्टा आदी पुरविण्यात यावी, यासाठी महापालिकेने जाहिरात दिली आहे. कोविड काळात महापालिकेने पंचतारांकित हॉटेलवर विशेष मेहेरबानी दर्शविली आहे.
पुण्यात अनेक चांगली हॉटेल्स, केटरर्स आहेत. ते कमी खर्चात चांगल्या चवीचे आणि दर्जेदार पदार्थ देऊ शकतात. पण, महापालिकेच्या अटींमुळे त्यांना या पासून वंचित राहवे लागत आहे. महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पंचतारांकित हॉटेलची अट घातली आहे, अशी आमची माहिती आहे. त्यामुळे या अटीत तातडीने बदल करावा.'
या बाबत महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "डॉक्टरांच्या निवासाची व्यवस्था करण्यास पीएमआरडीएने महापालिकेला सांगितले आहे. त्यांच्या मागणीनुसार महापालिकेने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पंचतारांकित हॉटेलच्या अटीबाबत त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यात येईल.'' पंचतारांकित हॉटेलचे दर मागविले असले तरी त्यांना कॉन्ट्रक्ट दिलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
- अजित पवार- फडणवीस पुन्हा एका मंचावर; काय बोलणार याकडे पुणेकरांचे लक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.