महापालिकेकडून मतदार जागृती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

कर्वेनगर  - नागरिकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांनी येत्या महापालिका निवडणुकीत अधिकाधिक मतदान करावे, यासंबंधी आवाहन करण्यासाठी राज्य निवडणूक आयोग व महापालिकेतर्फे जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी विविध घोषवाक्‍ये असलेले फलक वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पाच प्रभागांत लावण्यात येत आहेत.

नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी महापालिका कामाला लागली आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या निवडणुकीत अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे, यासाठीदेखील पालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, नूतन वर्षाच्या शुभेच्छा आणि मतदान करण्याची घोषवाक्‍य असलेले 10 फलक प्रत्येक प्रभागात लावण्यात येत असून, त्यात एकूण 50 फलकांचा समावेश आहे. "नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,' "मतदान करण्यास विसरू नका,' अशी वाक्‍ये त्यावर लिहिली आहेत.

वारजे- कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी गणेश सोनुणे म्हणाले, ""नवीन वर्षाची सुरवात आणि महापालिकेच्या निवडणुका नजीक आल्या आहेत. त्यानिमित्त शुभेच्छा देण्याबरोबरच मतदान करण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करण्याचा हा प्रयत्न आहे. जेणे करून मतदानाची टक्केवारी वाढेल.''

Web Title: Municipal Corporation voter awareness