Photo : पुण्यातील नवी प्रभाग रचना कशी आहे? माहिती एका क्लिकवर

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या पुणे महापालिका निवडणुकीसाठीची प्रभाग रचनेचे उत्सुकता मंगळवारी संपुष्टात आली आणि निवडणुकीचे बिगूल वाजले.

 पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांसह नवी प्रभाग रचना जाहीर झाली आहे.

प्रभाग रचनेच्या माध्यमातून सत्तेचा मार्ग गाठता येऊ शकतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. त्यासाठी रचना करताना झालेल्या तोडाफोडीमुळे सत्ताधाऱ्यांसह विरोध पक्षातील आजी-माजी नेत्यांची धाकधूक वाढल्याचे या निमित्ताने पाहावयास मिळाले.

त्यामुळे प्रभाग शोधण्यापासून ते उमेदवारी मिळविणे आणि आहे ती उमेदवारी टिकविण्यापर्यंतची पहिली लढाई अनेक विद्यमानांना करावी लागणार असल्याचे या निमित्ताने समोर आले.
त्यामुळे प्रभाग शोधण्यापासून ते उमेदवारी मिळविणे आणि आहे ती उमेदवारी टिकविण्यापर्यंतची पहिली लढाई अनेक विद्यमानांना करावी लागणार असल्याचे या निमित्ताने समोर आले. महापालिकेतील अनेक आजी-माजी पदाधिकारी नव्या प्रभाग रचनेमुळे अडचणीत आले. तर काहींना नेते मंडळींना सोईस्कर प्रभाग रचना करून घेण्यात यश मिळाले.
चित्रविचित्र रचनेमुळे अनेक विद्यामानांवर नव्याने प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे.

ओबीसी आणि महिला आरक्षणानंतर  नव्याने प्रभाग शोधण्याची वेळ आलेल्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अनेक प्रभागात इच्छुकांची संख्या वाढल्याने पक्षांत्तर वाढण्याची शक्यता आहे.

२०१७ च्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने याच रचनेच्या मदतीने शंभरचा आकडा गाठत महापालिकेची सत्ता हाती घेतली. त्याच पावलावर पाऊल टाकत महाविकास आघाडीने पहिल्या टप्प्यात प्रभाग रचनेच्या निमित्ताने तरी सत्ताधारी भाजपच्या नेत्यांची झोप उडविल्याचे दिसते.

भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या विधानसभा मतदार संघातील प्रभागांमध्ये तोडफोड करून त्यांच्यासाठी सत्तेचा मार्ग अवघड करण्याचा प्रयत्न केला आहे.

तर उपनगरातील प्रभागाच्या माध्यमातून पुन्हा सत्ता मिळविण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून झाला आहे. यापूर्वी समाविष्ट झालेली ११ आणि त्यानंतर २३ गावे अशा ३४ गावात जवळपास नगरसेवकांची संख्या जवळपास चाळीसने वाढली आहे.

नव्या प्रभाग रचनेमुळे मध्यवस्तीतील नगरसेवकांची संख्या कमी झाली आहे

 महानगरपालिकेच्या सुमारे ४७ जागा या ओबीसी आरक्षणासाठी राखीव असतील.

मध्यवस्तीत उमेदवारी मिळविण्यासाठी तर उपनगरात मोठा प्रभाग झाल्याने विजयासाठी झगडावे लागणार आहे.

कोथरूड मतदारसंघात महापौर मुरलीधर मोहोळ यांचा बावधन खुर्द-महात्मा सोसायटी हा प्रभाग क्रमांक ३३ किमया हॉटेल ते भूगाव असा ३० चौरस किलोमीटरपर्यंत पसरला आहे. त्यामुळे भाजपला येथे कसरत करावी लागणार आहे.

दरम्यान महिला आरक्षण हे अंतिम प्रभाग रचनेच्यावेळी जाहीर करण्यात येणार आहे.

शहरातील सर्वच प्रभागात बदल करण्यात आले आहेत.

प्रभाग रचना बदलल्याने शहरातील आजी-माजी पदाधिकारी अडचणीत सापडले आहेत

प्रभागरचना झाली तरीही आरक्षणे कशी पडतात यावर पुढचे राजकीय चित्र अवलंबून असेल.

 पुणे शहरात एकूण प्रभाग ५८ तर नगरसेवकांची संख्या ही १७३ इतकी आहे.

प्रभाग रचनेसंबंधीच्या हरकती या १४ फेब्रुवारीपर्यंत नोंदविता येणार आहेत

महिलांसाठी ८७ जागांवर आरक्षण राहणार आहे. तर एकूण जागांपैकी २३ जागांवर अनुसूचित जाती आणि दोन जागांवर अनुसूचित जमातीचे आरक्षण राहणार आहे.

ओबीसी आरक्षणाबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे, जर ओबीसी आरक्षण राहिले तर सुमारे ४७ जागा त्यांच्यासाठी राखीव असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com