Pune : पालिका निवडणुका लांबली, प्रशासकीय यंत्रणा तुंबली

गड्या आपली गामपंचायत बरी - उंड्री-पिसोळी, होळकरवाडी, औताडेवाडीकरांची व्यथा
Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporationsakal

उंड्री : महापालिकेच्या निवडणुका लांबल्याने लोकप्रतिनिधी नाहीत आणि प्रशासकीय यंत्रणाही ऐकत नाही, त्यामुळे तक्रार तरी कोणाकडे करायची असा सवाल समाविष्ट गावातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. पालिकेपेक्षा आपली ग्रामपंचायत बरी होती, असे म्हणण्याची वेळ उंड्री, पिसोळी, होळकरवाडी, हांडेवाड़ी, औताडवाडी, उरुळी देवाची, फुरसुंगीतील ग्रामस्थांवर आली आहे.

आमची गावे समाविष्ट होण्यापूर्वी समाविष्ट केलेल्या गावांसारखी अवस्था होऊ नये, अशी पुष्टीही ग्रामस्थांनी त्यावेळी दिली होती. मात्र, तीच परिस्थिती आमच्या नशिबी आली आहे. त्याचत महापालिका निवडणूक लांबणीवर पडल्याने पालिकेवर प्रशासकांची नियुक्‍ती केल्यानंतर उंड्री, पिसोळी, होळकरवाडी, औतेडवाडी, वडाचीवाडी गावाकडे झालेले दुर्लक्ष म्हणजे ये…रे… माझ्या मागल्या…, अशी स्थिती झाल्याचा ठपका ग्रामस्थ ठेवू लागले आहेत.

महापालिकेत गाव समाविष्ट झाल्यानंतर पुढील सहा-आठ महिन्यांत पालिकेची निवडणूक होणार होती. त्यामुळे आपल्या भागात स्थानिक नगरसेवक मिळून गावांचा विकास वेगाने होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांची होती. परंतु, पालिकेची निवडणूक लांबत गेली तसे गावातील जुन्या समस्या कायम राहून नव्याने वाढल्या आहेत. नागरीकरण वाढले मात्र, पाणी, रस्ता, वीज, ड्रेनेज, कचरा, पावसाळी वाहिन्या, आरोग्य अशा एक ना अनेक समस्या गंभीर बनत आहेत. अतिक्रमणांचा मुद्दा उग्र रूप धारण करीत आहे. शहराच्या हद्दीलगत असल्याने बांधकामांची अस्ताव्यस्त झालेली वाढ व यातून वाहनांची वर्दळ वाढल्याने रस्त्यांची झालेली दुरवस्था त्यांच्या दुरुस्तीकडे कायम दुर्लक्ष होत आहे.

कात्रज-मंतरवाडी बायपास मार्ग, सय्यदनगर-हांडेवाडी चौक, उंड्री चौक-सय्यदनगरसह अंतर्गत रस्त्यावर सतत वर्दळ असून, तासनतास वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. रस्तारुंदीकरण रखडल्याने नोकरदार, व्यावसायिक, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वाहतूककोंडीमुळे कुचंबना होत आहे. महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर फक्त कर वाढला मात्र, सुविधा शुन्य अशीच आमची अवस्था आहे.

अर्जुन सातव, सातवनगर

उंड्री, पिसोळी, हांडेवाडी, महंमदवाडी परिसरात प्रश्न पाणी गंभीर असून, बांधकामांची गती वाढत आहेत. ग्रामपंचायत कचरा, पाणी, आरोग्य, ड्रेनेज सुविधा देण्यात अपयशी ठरत होती, म्हणून नागरिकांनी महापालिका समावेशाला प्राधान्य दिले. मात्र, पालिकेत समावेशानंतर अद्याप उपाययोजना झाली नाही. पालिकेचा सगळाच अलबेल कारभार पहायला मिळत असल्याने, गड्या आपला गावच बरा होता.

-खंडेराव जगताप, विजया वाडकर हांडेवाडी चौक

भरमसाठ घराचा कर भरावा लागत आहे. मात्र, पाणीसुद्धा मिळत नसेल, तर कर का भरावा, जसे काम तसे दाम या उक्तीप्रमाणे कर भरणे थांबवले पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com