चारशे सेवकांचा बढतीला नकार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

पुणे - विविध संवर्गातील अधिकारी आणि सेवकांना बढती देताना सहाव्या आयोगानुसार प्रचलित असणाऱ्या ‘ग्रेड पे’ नुसार बढती द्यावी, अशी मागणी पीएमसी एम्प्लॉइज युनियनच्या शिष्टमंडळाने सोमवारी अतिरिक्त आयुक्तांना भेट घेऊन केली. अन्यथा आम्हाला बढती नको, असे चारशे कर्मचाऱ्यांनी महापालिका प्रशासनाला कळविले आहे. त्यामुळे प्रशासनापुढील अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे.

महापालिकेत बढती झाल्यानंतर वेतनात वाढ होण्याऐवजी अस्तित्वात असलेल्या वेतनात आणखी कपात होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रशासनाच्या चुकीमुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर होत असलेल्या प्रकरणास सर्वप्रथम ‘सकाळ’ने वाचा फोडली. 

पुढील दोन महिन्यांत महापालिकेच्या विविध विभागांतील सुमारे चारशे कर्मचाऱ्यांची बढती होणार आहे. त्यासाठी पात्रता यादीदेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे; परंतु त्या सर्व सेवकांनी सोमवारी अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांना भेटून ‘बढती देणार असाल, तर सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे ग्रेड पे नुसारच बढती द्यावी, अन्यथा आम्हाला बढती नको,’ अशा मागणीचे निवेदन दिले. त्यावर प्रशासन काय भूमिका घेणार याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रशासनाने सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत अनेक चुका आहेत. महापालिकेच्या आस्थापनेवरील सेवकांना राज्य शासनाने मंजूर केलेल्या आकृतिबंधानुसार बढती देताना सद्यःस्थितीतील वेतनापेक्षा कमी वेतन देण्यात येत आहे. बढती देताना ‘ग्रेड पे’नुसारच द्यावी. तसे न करता बढती दिल्यास आंदोलन करण्यात येईल.
- बापू पवार. अध्यक्ष, पीएमसी एम्प्लॉइज युनियन

Web Title: municipal employee promotion oppose