पालिका कर्मचाऱ्यांना तीन दिवसांत बोनस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

पुणे - महापालिकेच्या कर्मचारी संघटनेसोबत झालेल्या करारानुसार महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी अशा 22 हजार जणांना 8.33 टक्के बोनस आणि 11 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा आदेश शुक्रवारी देण्यात आला; मात्र, कर्मचाऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास तीन दिवस लागणार आहेत.

महापालिकेचा मुख्य विभाग, क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह शिक्षण मंडळ, बालवाडी शिक्षिका अशा सर्वांना बोनस व सानुग्रह अनुदान वितरित करण्याचे आदेश महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांनी काढले आहेत. या रकमा कर्मचाऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहेत. महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बोनसच्या विषयावर चर्चा झाली होती. महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार हे परदेश दौऱ्यावर असल्याने याबाबत योग्य कार्यवाही होऊ शकली नव्हती; मात्र, प्रशासनाने याबाबतची कार्यवाही पूर्ण केली असून, तीन दिवसांत रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यांत जमा होणार आहे.

Web Title: Municipal employees a bonus in three days

टॅग्स