पालिकेच्या इमारतीचे उद्या उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

पुणे - महापालिकेच्या नव्या इमारतीचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. 21) उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहतील, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी दिली.

महापालिकेच्या आवारात गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या प्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे व संजय काकडे, नॅशनल शिपिंग बोर्डाचे अध्यक्ष प्रदीप रावत उपस्थित राहणार आहेत.
या इमारतीच्या तळमजल्यावर नागरिक सुविधा केंद्र, एक खिडकी योजना कक्ष, पोस्ट ऑफिस, एटीएम, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) पास केंद्र असेल; तर पहिल्या मजल्यावर राजकीय पक्ष आणि नगरसचिव कार्यालय आहे. दुसऱ्या मजल्यावर उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, उपमहापौर, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता, विविध समित्यांची कार्यालये आहेत. तिसऱ्या मजल्यावर महापौरांचे कार्यालय आणि मुख्य सभागृह आहे, असेही टिळक यांनी सांगितले. दरम्यान, या इमारतीचे काम घाईगडबडीत केले आहे. केवळ उद्‌घाटनाचा आटापिटा सुरू असल्याचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी म्हटले आहे. उद्‌घाटनाआधी नव्या सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली आहे.

Web Title: municipal new building inauguration