Pune : भवानी पेठेतील उर्दू शाळेतील अनधिकृत बांधकामाबाबत पालिकेची नोटीस

भवानी पेठेतील सि.स.नं.६४७, हाजी गुलाम मोहम्मद आझम उर्दू प्रायमरी स्कूलमध्ये अनधिकृत बांधकाम केले असून, ते त्वरित काढून टाकण्यासाठी पालिकेने नोटीस बजावली आहे.
Pune : भवानी पेठेतील उर्दू शाळेतील अनधिकृत बांधकामाबाबत पालिकेची नोटीस

कॅन्टोन्मेंट : भवानी पेठेतील सि.स.नं.६४७, हाजी गुलाम मोहम्मद आझम उर्दू प्रायमरी स्कूलमध्ये अनधिकृत बांधकाम केले असून, ते त्वरित काढून टाकण्यासाठी पालिकेने नोटीस बजावली आहे. मात्र, नोटीशीची मुदत संपल्यानंतरही अतिक्रमण हटविेले नाही व खुलासा केला नाही. पुढील पंधरा दिवसात अतिक्रमण हटविले नाही, तर पालिका प्रशासनाकडून थेट कार्यवाही केली जाईल आणि त्याचा खर्चही वसूल केला जाईल, असे पालिकेच्या कनिष्ठ अभियंता व उपअभियंता यांनी दिलेल्या नोटीशीमध्ये म्हटले आहे.

क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष मनोज क्षीरसागर यांनी बांधकाम विकास विभागाकडे तक्रार संबंधित स्कूलमधील अनधिकृत बांधकामाविषयी तक्रार दिल्यानंतर पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नोटीस पाठविली आहे. मात्र, मुदत उलटूनही कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेली नसल्याचे निदर्शनास आढळून आले आहे. त्यानुसार पालिकेच्या अभियंत्यांनी पुढील पंधरा दिवसात हटविले नाही, तर थेट कारवाई केली जाईल, असे नोटीस मध्ये म्हटले आहे.

दरम्यान, सचिव एस.बी..एच. इनामदार म्हणाले की, कोणतेही अतिक्रमण केले नाही. संबंधित अधिकाऱ्यांकडून माहितीच्या अधिकारात प्रत मागवली आहे. अद्याप आम्हाला कुठल्याही प्रकारचे उत्तर मिळालेले नाही. येथे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या मिळकतीचा वाद असल्याने कागदपत्र शोधण्यासाठी वेळ लागत असल्याने आम्ही बांधकाम विभागाकडे वेळ मगितला आहे. तपासणीत जर आमचे अतिक्रमण विभागाला आढळून आल्यास आम्ही ते काढून टाकू, असे त्यांनी स्पष्ट केले.

या संबंधित कनिष्ठ अभियंता रुपेश वाघ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, यासंदर्भात नियमितीकरण करण्यासाठी आर्किटेक ने पत्र दिले आहे त्यावर त्यांचा अर्ज फेटाळण्याचे उत्तर देणार आहोत. येत्या गुरुवारी अतिक्रमण काढण्याची कारवाई करणार असल्याचे वाघ म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com