महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय योजनेसाठी उचलले महत्त्वाचे पाऊल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

नव्या हॉस्पिटलच्या समावेशाबाबत विचार
योजनेची पुनर्रचना करताना त्यात नव्या हॉसिपटलचा समावेश करण्याचा विचार आहे. त्यासाठी सभागृह नेते धीरज घाटे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांची मंगळवारी पुन्हा बैठक घेतली. तेव्हाही आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांची सविस्तर माहिती प्रसिद्ध करावी, असेही घाटे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

पुणे - नगरसेवक, अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या अंशदायी वैद्यकीय योजनेचे ‘पोस्टमार्टेम’ करण्यासाठी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले. योजनेच्या लाभार्थ्यांची नावे, उपचार घेतलेले हॉस्पिटल आणि झालेल्या खर्चाची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. परिणामी, आरोग्य योजनेचे नेमके लाभार्थी कोण, याचा शोध लागणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरी गरीब आणि अंशदायी वैद्यकीय योजनेची माहिती महिन्याकाठी सादर करतानाच लाभार्थ्यांची नावे जाहीर करावीत, अशी सूचना स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना केली. गरीब रुग्णांसह नगरसेवक, महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी या योजना राबविण्यात येतात. त्यावर वर्षाला सव्वाशे कोटी रुपये खर्च असल्याचा हिशेब आहे. तरीही, गरीब रुग्णांना उपचार मिळत नसल्याच्या प्रचंड तक्रारी आहेत; तर अंशदायी योजनेतून नगरसेवक, त्यांचे कुटुंबीय, अधिकारी-कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलची बिले देताना आरोग्य खाते हात मोकळा सोडत असल्याचे स्पष्ट झाले.

पुण्यातील ‘खडकवासला’ची वीज कधी होणार चालू वाचा

त्यामुळेच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपचाराचा खर्च या वर्षात ५० कोटींच्या घरात जाण्याची शक्‍यता आहे. या माहिन्यात तो ४५ कोटी झाला. खर्च करूनही लाभार्थ्यांच्या नोंदी आरोग्य खाते ठेवत नसल्याचे उघड झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal office-bearers take important steps for medical planning

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: