मिळकतकराला मिळवा सवलत

pcmc
pcmc

पिंपरी - महापालिकेतर्फे २०१९-२०२० या आर्थिक वर्षातील दोन्ही सहामाहीची मिळकतकराची रक्कम थकबाकीसह ३० जूनपर्यंत एकरकमी भरल्यास मिळकतधारकांना सामान्य करात सवलत देण्यात येणार आहे. नागरिकांनी या सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

यामध्ये माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या पत्नी राहत असलेल्या मिळकतीस ५० टक्के, महिलांच्या नावे असलेल्या निवासी घरास ५० टक्के, ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्तींच्या नावावर असलेल्या मिळकतीस ५० टक्के, ग्रीन बिल्डिंग रेटिंग सिस्टिम राबविणाऱ्या मिळकतीस ५ ते १५ टक्के, स्वतंत्र नोंद असलेल्या निवासी मिळकतीस १० टक्के, तर बिगरनिवासी, मिश्र, औद्योगिक, मोकळ्या जमिनी यासाठी ५ टक्के सामान्यकरात सवलत देण्यात येणार आहे. तसेच १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत संपूर्ण बिलांची रक्कम भरल्यास संरक्षण दलातील शौर्य पदकधारक आणि माजी सैनिकांच्या विधवा यांचे नावे मालमत्तांना चालू वर्षाच्या मालमत्ता करात १०० टक्के सवलत दिली जाणार आहे. संरक्षण दलातील अविवाहित हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या नामनिर्देशित मालमत्तांना चालू वर्षाच्या मालमत्ता करात १०० टक्के सवलत देण्यात आली आहे, अशी माहिती करसंकलन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

ऑनलाइनसाठीही सवलत
डिजिटल व्यवहारांना चालना मिळावी, यासाठी ३० जूनअखेर मिळकतकराचा ऑनलाइन भरणा केल्यास चालू वर्षाच्या मागणीतील सामान्य करात पाच टक्के सवलत (अनुक्रमांक १ ते ५ सवलत योजनांकरिता) व त्यापुढे ३१ मार्च २०२० अखेर मिळकतकराचा ऑनलाइन भरणा केल्यास चालू वर्षाचे मागणीतील सामान्य करात दोन टक्के सवलत मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com