शास्तीकरप्रश्‍नी महापालिकेवर मोर्चा

चिंचवड - शास्तीकर हटाव संघर्ष समितीने शास्तीकर माफ करावा आणि इतर मागण्यांसाठी महापालिकेवर गुरुवारी मोर्चा काढला.
चिंचवड - शास्तीकर हटाव संघर्ष समितीने शास्तीकर माफ करावा आणि इतर मागण्यांसाठी महापालिकेवर गुरुवारी मोर्चा काढला.

पिंपरी - शास्तीकर आणि रिंगरोड रद्द झाला पाहिजे, बांधकाम नियमितीकरण, रेडझोन, साडेबारा टक्के परतावा आदी मागण्यांसाठी शास्तीकर हटाव संघर्ष समितीने पालिकेवर मोर्चा काढला. तसेच शास्तीकरबाधितांना आलेल्या नोटिसांची पालिका मुख्यालयासमोर होळी केली.

तसेच, मागण्या मान्य न झाल्यास क्रांतिदिनी मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. यासंदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले. मोर्चात माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक सचिन चिखले, वैशाली घोडेकर, मयूर कलाटे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, रिंगरोड बचाव समितीचे नागरिक उपस्थित होते.

लांडे म्हणाले, ‘‘सध्याचे सरकार खोटे बोलून वेळ मारून नेत आहे. अनधिकृत बांधकामे नियमित झाली पाहिजेत. रेडझोनचा प्रश्‍न सुटला पाहिजे. पालिकेकडे सहा हजार कोटीचे बजेट असताना नागरिकांच्या पैशावर हे सरकार टपले आहे. 

साने म्हणाले, ‘‘शास्ती, रेडझोन, अनधिकृत बांधकामे याविरोधात भाजपने नुसते गाजर दाखवले आहे. सध्याचे सरकार कुंभकर्ण आहे. खोटी आश्‍वासने दाखवली जात आहेत. शास्तीकराचे राजकारण करू नका.’’

भापकर म्हणाले, ‘‘२००८पासून शास्तीसाठी लढा सुरू आहे. शिवसेना आणि भाजप त्या वेळी आंदोलनात सोबत असायचे. आताच्या आमदारांनी आश्‍वासने दिली.’’

बेलसरे म्हणाले, ‘‘नागरिकांवर अन्यायकारक कर लादला गेला आहे. लघुउद्योगाच्या एकाही बांधकामाची शास्ती भरणार नाही. मिळकतकर भरायला आम्ही तयार आहोत.’’

चिखले म्हणाले, ‘‘शास्ती माफ झाली पाहिजे. रिंगरोड रद्द झाला पाहिजे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com