पालिका उभारणार चऱ्होलीत रस्त्यांचे जाळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

पिंपरी - चऱ्होली परिसरात रस्त्यांचे जाळे विणले जात असून, तीन रस्त्यांना महापालिका स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली. तसेच परिसरातील वाड्यावस्त्यांना जोडणारे आणखी सहा रस्ते प्रस्तावित आहेत. 

महापालिकेत चऱ्होलीचा १९९७ मध्ये समावेश झाला. तेव्हापासून पुणे-आळंदी रस्ता मुख्य मार्ग होता. चऱ्होली फाटा ते गाव आणि काळजे वस्ती-ताजणे मळामार्गे चऱ्होली गाव असे पूर्वी दोन रस्ते होते. आता जुन्या रस्त्यांच्या रुंदीकरणासह नवीन रस्त्यांची निर्मितीही सुरू आहे. 

या कामाला वेग आला असून बांधकाम व्यावसायिकांनी मोठमोठे प्रकल्प उभारणीला सुरवात केली आहे. त्यामुळे नोकरदारांकडूनही घरांसाठी प्राधान्य दिले जात आहे. परिणामी, चऱ्होलीची वाटचाल गावाकडून शहराकडे सुरू आहे. गावामध्ये वेगवेगळ्या सुविधा निर्माण होत आहेत. पुणे-आळंदी पालखी मार्गाच्या रुंदीकरणासाठी काही शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या होत्या. त्यामुळे थोरल्या पादुका मंदिरापासून धाकट्या पादुका मंदिरापर्यंतच्या तीन-साडेतीन किलोमीटरच्या पट्ट्यातील काही जमिनी ताब्यात नव्हत्या. त्यामुळे रुंदीकरण रखडले होते. आता जमिनींचे संपादन झालेले असून, रखडलेले रुंदीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. चऱ्होलीगाव ते लोहगाव यांना जोडणाऱ्या विमानतळ रस्त्याचे कामही सुरू आहे. त्यामुळे चऱ्होलीचे महत्त्व वाढत आहे. 

रस्त्यांची सद्यःस्थिती
 रुंदीकरण सुरू असलेले : पुणे-आळंदी पालखी मार्ग, चऱ्होली फाटा ते चऱ्होलीगाव, काळजेवाडी मार्गे चऱ्होलीगाव
 नव्याने सुरू असलेले : चऱ्होली खुर्द इंद्रायणी पूल ते दाभाडेवस्ती मुंजोबा मंदिर, चऱ्होलीगाव ते लोहगाव
 स्थायीने मंजूर केलेले रस्ते : सर्वे क्रमांक ३०१ ते ३१५ पर्यंत १८ व २४ मीटर रुंद डीपी रस्ता, आझादनगर ते काळजेवाडी १८ मीटर डीपी रस्ता, वडमुखवाडी सर्वे क्रमांक १२३ ते सर्वे क्रमांक १८० अर्थात ९० मीटर रस्त्यापर्यंत

चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडी परिसरातील तीन रस्त्यांना स्थायी समितीने मंजुरी दिलेली आहे. आणखी सहा रस्ते प्रस्तावित आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील राजा शिवछत्रपती चौकापासून वडमुखवाडी रस्त्याचे रुंदीकरण विचाराधीन आहे. 
- नितीन काळजे,  माजी महापौर व विद्यमान नगरसेवक

Web Title: municipal road network in the Charholi