मदतनीस बसून; विद्यार्थी धुतात ताटे

मोहननगर - महापालिकेच्या शाळेत धोकादायक पद्धतीने ताट धुताना मुले.
मोहननगर - महापालिकेच्या शाळेत धोकादायक पद्धतीने ताट धुताना मुले.

पिंपरी - विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी महापालिका व खासगी शाळांमध्ये केंद्र सरकारकडून ताटात पोषण आहार पुरविला जातो. जेवणानंतर विद्यार्थ्यांचे ताट धुणे आदी कामांसाठी मदतनिसांना प्रत्येकी दोन हजार रुपये मानधन दिले जाते; परंतु अनेक शाळांमध्ये मदतनीस बसून; तर मुले नळाच्या कठड्यावर धोकादायक पद्धतीने बसून ताट धूत असल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे. 

शहरात महापालिका व खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित प्राथमिक शाळा, उच्च प्राथमिक अशा ४४२ शाळांमधील पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना आहार दिला जातो. त्यासाठी १३ संस्था व बचत गटांना हे काम दिले आहे. शिक्षण संचालक कार्यालयाने मुलांच्या जेवणासाठी स्टीलचे ताट, वाटी व ग्लास पुरवले; परंतु ते धुणार कोण? त्यामुळे डब्यातच आहार दिला जात होता. एकीकडे उपस्थिती वाढविण्यासाठी पोषण आहार पुरविला जातो, दुसरीकडे मुलांकडूनच स्वच्छतेची कामे करून घेतली जात असल्याने उपस्थिती वाढणार कशी, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. 

शाळास्तरावर आहार तयार करण्यासाठी स्वयंपाकी व मदतनिसाची नेमणूक केली जाते. शहरी भागात विद्यार्थीसंख्येवर मदतनिसांची संख्या ठरली आहे. ज्या संस्थेकडे १००१ ते ५००० विद्यार्थीसंख्या त्यांना नऊ हजार मानधन दिले जाते. किती कर्मचारी भरायचे, संस्थेवर अवलंबून आहे. साधारणतः कर्मचाऱ्यांना दोन व दीड हजार रुपये मानधन मिळते. मात्र, मानधन तुटंपुजे असल्याची ओरड कर्मचाऱ्यांकडून वारंवार केली जाते. उपलब्ध मानधनातच त्यांना आहार तयार करणे, स्वच्छता राखणे, जेवणानंतर विद्यार्थ्यांची ताट धुणे आदी कामे करावी लागतात. कमी पैशात कोण एवढे काम करेल, अशी भूमिका घेतल्याने अनेक शाळांमध्ये खिचडी खाल्ल्यानंतर मुलांनाच ताट धुण्यास सांगितले जाते.

ही मुले शाळेच्या आवारातील नळाच्या कठड्यावर बसून धोकादायक पद्धतीने बसून ताट धुतात. पाणी फरशीवर पडल्याने व ती निसरडी झाल्याने दुखापत होऊ शकते. याकडे अनेक मुख्याध्यापकांकडून सर्रास दुर्लक्ष केले जात आहे.

शहरी भागात दोन मदतनिसांची नेमणूक केली जाते. त्यांना तीन हजार रुपये मानधन दिले जाते. सर्व कामे त्यांनीच केली पाहिजेत. ताट धुणे हे विद्यार्थ्यांचे काम नाही. 
- सचिन देशमुख, शालेय पोषण आहार समन्वयक, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com