Video : सकाळमुळे महापालिकेची यंत्रणा शांतीनगरमध्ये

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

पुणे : येरवड्यातील शांतीनगर मधील सुमारे 200 घरामध्ये 6 ते 8 तास पाणी शिरुनही महापालिकेची बचाव यंत्रणा घटनास्थळी नव्हती. मात्र, सकाळने या ठिकाणी जात येथील स्थिती फेसबुक लाईव्हद्वारे मांडल्यानंतर अर्धा तासात अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोचली

मुळा नदीमध्ये गटाराद्वारे सोडण्यात येणारे संडपाणी नदीतील पाण्याच्या जोरामुळे तुंबून शांतीनगर मधील रहिवाशांच्या घरामध्ये शिरले. हे पाणी शिरुन 6 ते 8 तास होऊनही महापालिकेची यंत्रणा येथे पोचली नाही.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाण्यातील काही वस्तू रहिवाशांनी काढल्या. परंतु अनेकांच्या सगळ्या वस्तू तशाच पाण्यात तरंगत होत्या. या परिस्थितीचे सकाळने फेसबुक लाईव्ह केले. त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी ताबडतोब अग्निशमन दलाला या ठिकाणी पाठवले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal system in Shantinagar due to sakal Facebook Live