कसब्यात काँग्रेसला अस्मान दाखवण्यासाठी भाजपने 'या' शिलेदारांवर दिली जबाबदारी|Pune Bypoll Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Bypoll Election

Pune Bypoll Election 2023: कसब्यात काँग्रेसला अस्मान दाखवण्यासाठी भाजपने 'या' शिलेदारांवर दिली जबाबदारी

Kasba By Election Updates: कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता असतांना दोन्ही प्रमुख पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्रीय नसल्याचे दिसून आले होते.

मात्र आत्ता फडणवीस सक्रीय झाल्याचे पाहिला मिळत आहे. कसबा आणि चिंचवडचा गड राखण्याची जबाबदारी भाजपने निवडणुक प्रभारीपदी मुरलीधर मोहोळ,

तसेच कसबा निवडणूक प्रमुखपदी माधुरी मिसाळ व सहप्रमुख धीरज घाटे आणि चिंचवडच्या प्रमुखपदी शंकर जगताप यांच्यावर दिली आहे.

मुरलीधर मोहोळ हे फडणवीसांचे विश्वासू मानले जातात. त्यामुळे ही नियुक्ती करण्यात आली असावी. मुरलीधर मोहोळ मागील काही काळापासून खुप चर्चेत आहेत.

मोहोळ यांनी महाराष्ट्र केसरी कुस्तीचे आयोजन केले होते, आणि मोहळ यांचा मोठा अनुभव देखील मतदारसंघात आहे.

दरम्यान कसब्यात काँग्रेसने देखली भाजप समोर तगडं आव्हान दिलं आहे. त्यामुळे ही निवडणुक भाजपने प्रतिष्ठीची केली आहे.

टॅग्स :BjpCongress