भाजप कार्यकर्ते लिमण यांचा खून 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

सोमाटणे - किरकोळ भांडणाचा राग मनात धरून सांगवडेच्या सरपंच दीपाली लिमण यांचे पती व भाजपचे कार्यकर्ते नवनाथ लिमण यांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. 

अपर पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत नवनाथ अर्जुन लिमण (वय 32, रा. सांगवडे) यांचे आरोपीबरोबर चार दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. 

गावचे ग्रामदैवत भैरवनाथ देवाच्या उत्सवानिमित्त गावात कीर्तन भजन सप्ताह सुरू होता. या सप्ताहानिमित्त भजनाच्या कार्यक्रम संपल्यावर शनिवारी मध्यरात्री लिमण आपल्या सहकाऱ्यांबरोबर मंदिराजवळ बसले असताना चार ते पाच जण मोटारीतून (एमएच 14 एफएक्‍स 032) घटनास्थळी आले व काही समजण्याच्या आत लिमण यांच्यावर हल्ला करून त्यांच्या डोके, पोट, हातावर, तलवार, कोयता व लाकडी दांडक्‍याने वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाले. ग्रामस्थांनी तातडीने लिमण यांना उपचारासाठी सोमाटणे येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले; परंतु डॉक्‍टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. 

याबाबत विश्वास लिमण यांनी तळेगाव पोलिसात तक्रार दिली. तळेगाव पोलिसांनी अज्ञात पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दोन संशयितांची नावे पोलिसांना समजली आहेत. त्यांना लवकरच अटक करण्यात येणार आहे. 

घटना समजताच पोलिस अधीक्षक हक, राम जाधव, पोलिस निरीक्षक मुगुट पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, आज सांगवडे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने तळेगाव पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. 

Web Title: The murder of BJP activist