दोघांच्या खूनप्रकरणी एकाला अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

पुणे - सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराचा खून करून पसार झालेल्या संशयिताला बंडगार्डन पोलिसांनी पुणे स्थानक परिसरातून रविवारी पहाटे अटक केली. रिसे (ता. पुरंदर) येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर शनिवारी सायंकाळी खून केल्यानंतर संशयिताने पलायन केले होते. 

पुणे - सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराचा खून करून पसार झालेल्या संशयिताला बंडगार्डन पोलिसांनी पुणे स्थानक परिसरातून रविवारी पहाटे अटक केली. रिसे (ता. पुरंदर) येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर शनिवारी सायंकाळी खून केल्यानंतर संशयिताने पलायन केले होते. 

संतोष गोविंद कुमावत (वय 26, रा. साईनाथ सोसायटी, पांढरे मळा, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या घटनेत अनिल ज्ञानदेव शिवरकर (वय 40, रा. म्हातोबाची आळंदी) आणि मनोज उर्फ संतोष शिवाजी जगताप (वय 38, रा. लोणी काळभोर) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमावत हासुद्धा सराईत गुन्हेगार असून, खुनाच्या प्रयत्नातील गुन्ह्यात सात वर्षे येरवडा तरुंगात शिक्षा भोगून तो काही दिवसांपूर्वीच बाहेर आला आह; तर शिवरकर याच्यावर जेजुरी, सासवड, लोणी काळभोर, हडपसर पोलिस ठाण्यात चोरीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. 

शिवरकरने शनिवारी दुपारी कुमावतला जेवणासाठी बाहेर जायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार शिवरकर, त्याचा मित्र जगताप व कुमावत हे तिघे दुचाकीवरून रिसे येथील एका शेतात गेले. त्या ठिकाणी मद्यपान केल्यानंतर त्यांच्यामध्ये जुन्या प्रकरणावरून वादावादी सुरू झाली. शिवरकर व जगताप या दोघांनी कुमावतला दमात घेण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यामध्ये भांडणे झाली. त्या वेळी कुमावतने शिवरकरच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. जगतापचे डोके दगडावर आदळून दोघांचा खून करून त्याने तेथून पळ काढला. ज्वारीच्या शेतात शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास नवनाथ आडसूळ यांना दोन मृतदेह आढळले. त्यांनी त्वरित जेजुरी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवरकरच्या हातावर गोंदलेले असल्याने त्यावरून त्याची ओळख पटली. शिवरकरचा खून झाल्याने हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय व्यक्त केला. त्यानुसार तपास सुरू केला. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास कुमावत हा पुणे स्थानकाच्या परिसरात आल्याची माहिती बंडगार्डन पोलिस ठाण्याचे कर्मचारी सचिन कदम यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून व पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले.

Web Title: Murder case one arrested