मुळशीत रस्त्याच्या वादातून खून

crime
crime

पिरंगुट (पुणे) : मुळशी तालुक्यातील मोसे खुर्द येथील शेतीच्या रस्त्याच्या वादातून आज एकाचा निर्घृण खून करण्यात आला. 

भाऊ सामा मरगळे (रा. तव, ता. मुळशी, वय 35), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, आज सकाळी साडे नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास मोसे खोऱ्यातील सांडवघर व मोसे खुर्द या दोन गावांच्या दरम्यान असलेल्या मोसे खुर्द गावच्या हद्दीत ही घटना घडली. याबाबत पोलिसानच्या स्थानिक गुन्हे शाखेने चार आरोपींना डोंगरात पाठलाग करून तातडीने अटक केली आहे. या घटनेतील गणेश रामभाऊ मरगळे (वय 23 रा. किरकिटवाडी, ता. हवेली), राजू ज्ञानोबा मरगळे (वय 19), विजय बाबूराव मरगळे (वय 22) व सुनील रामभाऊ मरगळे (वय 20 सर्व रा. तव, ता. मुळशी ) आदी चार आरोपींना अटक केली आहे. 

आरोपीनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी पौड पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे . सदरची कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पद्माकर घनवट व पौड पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे, सहायक फौजदार दत्तात्रेय जगताप, रौफ इनामदार, मुकुंद आयचीत, गुरू जाधव, विजय कांचन, लियाकत मुजावर, अमोल शेडगे, मंगेश भगत, सुधीर अहिवळे, धीरज जाधव यांनी केली.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com