esakal | शेतमजुराचा खुन; फरार आरोपी अटकेत
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

शेतमजुराचा खुन; फरार आरोपी अटकेत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मंचर : मंचर (manchar) येथे शेतमजुराचा गळा आवळून खून करून फरारी झालेल्या दीपक साळुंखे उर्फ फारुक (वय ४०) याला स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पोलीस (pune rural police) पथकाने लोणावळा (lonavala) येथे अटक केली आहे. साळुंखे हा मुंबईतील (mumbai) सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्या विरोधात मुंबई (mumbai) येथे चारकोप पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. (Murder farm laborer Fugitive accused arrested pune police)

मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कैलास सोमनाथ ठाकुर (वय ५०) या शेतमजुराचा गुरुवारी (ता.८) रोजी गळफास देऊन आरोपी दीपक साळुंखे याने खून केला होता. तेव्हा पासून आरोपी फरार होता. सदर आरोपीचे पूर्ण नाव व मुळगाव या बाबत कसल्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसल्याने तसेच आरोपी दुहेरी नाव धारण करून राहत असल्याने सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणे अवघड व किचकट झाले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना योग्य त्या सुचना व मागदर्शन करून पोलीस पथक कार्यान्वित करण्यास सांगितले होते.

हेही वाचा: दुबई-मुंबईच्या विमानात बॉम्बच्या धमकीनं खळबळ!

पोलीस पथक मंचर व परिसरात आरोपीचा शोध व तपास करत असताना घनवट यांना गोपनीय बातमीदारा मार्फत समजले की, सदर गुन्हयातील आरोपी दिपक साळुंखे उर्फ फारुख हा गुन्हा केलेपासुन फरारी आहे. आरोपी लोणावळा परिसरात असून तो मुंबई बाजुकडे पळुन जाण्याच्या तयारीत आहे. तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या पोलीस नाईक हनुमंत पासलकर, विक्रम तापकिर, दिपक साबळे, सचिन गायकवाड, वाघमारे, संदिप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, अक्षय जावळे या पथकाने लोणावळा शहरात वेष बदलून सापळा रचला.

तेथे कामगार कट्टा एसटी स्टँड येथून संशयीत इसम ताब्यात घेतला. त्याचेकडे चौकशी केली असता त्याने दिपक विष्णू साळुंखे उर्फ फारुख उर्फ काळू (वय. ४२ मूळ. रा. कांदिवली चारकोप हिंदुस्तान नाका. मालाड वेस्ट मुंबई. सध्या रा. मुळेवडी रोड, मंचर, ता. आंबेगाव जिल्हा. पुणे) असे सांगितले. पुढील कार्यवाही कामी वैद्यकीय तपासणी करून मंचर पोलीस ठाण्याच्या ताब्यात आरोपीला दिले. अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधीकारी अनिल लंभाते यांचे हि मार्गदर्शन लाभले. पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे करत आहे.

loading image