esakal | दुबई-मुंबईच्या विमानात बॉम्बच्या धमकीनं खळबळ!
sakal

बोलून बातमी शोधा

 flight

दुबई-मुंबईच्या विमानात बॉम्बच्या धमकीनं खळबळ!

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : दुबईहून मुंबईकडे येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याच्या कॉलने शनिवारी मोठी खळबळ उडाली. मात्र, यंत्रणांच्या तपासानंतर हा दिशाभूल करण्यासाठी केलेला खोटा कॉल असल्याचं उघड झालं. एअर ट्रॅफिक कन्ट्रोलला शनिवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास हा कॉल आला होता. मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती दिली. (Bomb threat on Dubai Mumbai flight turns out to be hoax call aau85)

हेही वाचा: कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची होणार आता क्षयरोग चाचणी!

पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास दुबईच्या एअर ट्रॅफिक कन्ट्रोलला (ATC) एक फोन आला होता. यामध्ये दुबई-मुंबई विमानात आरडीएक्स ही स्फोटकं असल्याचं सांगण्यात आलं होतं. या फोनकॉलनंतर दुबई ATCनं याची माहिती दिल्ली ATCला दिली. त्यानंतर दिल्ली ATC नं मुंबई ATCशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. टाइम्सनाऊ न्यूजने याबाबत वृत्त दिलं आहे.

हेही वाचा: DRDO विकसीत करतंय ड्रोनविरोधी स्वदेशी तंत्रज्ञान

या धमकीच्या कॉलनंतर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान लँड होण्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. विमान मुंबईत उतरल्यानंतर CISFच्या अधिकाऱ्यांनी विमानाची कसून तपासणी केली. मात्र, यामध्ये कुठलीही बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे धमकीचा कॉल दिशाभूल करण्यासाठी असल्याचं निष्पण्ण झालं आहे.

loading image