जोगेश्‍वरीत विकसकाची हत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

मुंबई - महिलेच्या वेशात आलेल्या मारेकऱ्याने विकसकाची चाकूने हल्ला करून हत्या केली. जोगेश्‍वरी परिसरात शनिवारी ही घटना घडली. अली असगर बानकुरवाला (वय 38) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाकरिता पाच पथके तयार केली आहेत.

अली असगर पूर्वी माझगाव येथे राहत होते. "रिलायबल होम मेकर' या नावाने त्यांची बांधकाम क्षेत्रातील कंपनी आहे. अलीने घटस्फोटित महिलेशी फेब्रुवारीत लग्न केले होते. लग्नानंतर पत्नीसह ओशिवरा येथील आयरिश पार्क या इमारतीत राहत होते; मात्र त्यांच्या पत्नीच्या पहिल्या पतीला या गोष्टीचा राग होता. शनिवारी सकाळी मारेकरी इमारतीत घुसला. त्याने बुरखा घातल्याने इमारतीच्या सुरक्षारक्षकाला संशय आला नाही. मारेकरी थेट 15 व्या मजल्यावर अली यांच्या घरात घुसला. त्याने अली यांच्या पत्नीवर चाकूने हल्ला केला. तिने आरडाओरडा केल्याने अली घटनास्थळी धावत आले. जखमी पत्नीला त्यांनी एका खोलीत लपवले; मात्र मारेकऱ्याने नंतर अली यांच्यावर प्राणघातक हल्ला करून पळ काढला.

याबाबत अली यांच्या पत्नीने ओशिवरा पोलिसांना कळवले. पोलिसांनी अली यांना उपचाराकरिता सरकारी रुग्णालयात दाखल केले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

Web Title: murder in jogeshwari