esakal | ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा खून

बोलून बातमी शोधा

Murder
‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा खून
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

केसनंद : पेरणे फाटा (ता. हवेली) येथे ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा चारित्र्याच्या संशयातून वायरने गळा आवळून खून करून जोडीदार पोलिस ठाण्यात हजर झाल्याची घटना आज दुपारी घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

खून झालेल्या मुलीचे नाव भारती ऊर्फ विशाखा राममूर्ती अय्यर (वय १७, रा. लक्ष्मीनगर, रामनगर झोपडपट्टी रस्ता, पेरणेफाटा, ता. हवेली) असे असून या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तिचा जोडीदार सागर सारंगधर वानखडे (वय २७, रा. कुंधेगाव, पो. कोडरी, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा) याच्याविरुध्द खुनासह इतर गुन्हे दाखल करून अटक केली.

हेही वाचा: पुण्यातील नदीसुधार प्रकल्पावर आक्षेप

याबाबत लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेरणे फाटा (ता. हवेली) येथे एका मुलीचा खून झाल्याची खबर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विनायक वेताळ व लोणीकंद तपास पथक हे तातडीने घटनास्थळी गेले. या वेळी तेथे एक अल्पवयीन मुलगी मृतावस्थेत पडलेली आढळून आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आरोपी वानखडे यास ताब्यात घेतले आहे.