पाटस येथे दोन तरुणांची हत्या

पाटस येथे दोन तरुणांची हत्या

पाटस : दौंड तालुक्यातील पाटस येथे दोन तरुणांची तलवारीने वार करुन तसेच डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. तामखडा भागात रविवारी (ता.४) रात्री साडे दहा वाजता हा धक्कादायक थरार घडला. शुभम संतोष शितकल (वय २३) तसेच गणेश रमेश माकर (वय २३) दोघेही राहणार पाटस (ता.दौंड जि.पुणे) असे मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर महेश टुले, मन्या उर्फे महेश भागवत दोघेही राहणार पाटस (तामखडा) युवराज शिंदे राहणार गिरीम (ता.दौंड) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी माहीती दिली.

पाटस येथे दोन तरुणांची हत्या
संसाराचा अळणी खेळ, भांडायलाही द्या जरा वेळ!

शुभम संतोष शितकल व गणेश माकर यांना आरोपी मन्या उर्फे महेश यांने मोबाईलवरून शिवीगाळ केली, तसेच वाद झाला होता. त्याचा जाब विचारण्यासाठी शुभम आणि गणेश हे तामखडा येथे गेले होते. त्यावेळी आरोपींनी दोघांवर हल्ला केला. तलावरीने वार करीत डोक्यात दगड घालून दोघांची हत्या केली. घटनेनंतर आरोपी फरार झाले. माहिती मिळताच यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे, पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दौंड उपविभागीय पोलिस

पाटस येथे दोन तरुणांची हत्या
प्रेयसीला पळवून नेणाऱ्याचा पत्ता माहीत करून घेण्यासाठी खून

अधिकारी राहूल धस यांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी केली. दोन्ही मयत तरुणांचे मृतदेह विच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले. मयतांच्या कुटुंब व नातेवाइकांचा मोठा जमाव जमविल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पाश्वभूमीवर पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला. या प्रकरणी अर्जुन माकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यातील तीन आरोपींची नावे निष्पन्न झाली. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना झाली असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील करीत आहेत.

दरम्यान या दुहेरी हत्याकांडानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पाटस परिसरात गुन्हेगारीने डोके वर काढले असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com