Pune : अनैतिक संबंधाच्या संशयातून झालेल्या खुनाचा छडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

अनैतिक संबंधाच्या संशयातून झालेल्या खुनाचा छडा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयातून शाळेवर काम करणाऱ्या सुरक्षारक्षकाचा खून केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी चौघांना अटक करीत गुन्हा उघडकीस आणला आहे. ऋषीकेश राजेश गायकवाड (वय २३, रा. भाग्योदयनगर, कोंढवा), किशोर भागवत गायकवाड (वय २९, रा. खडी मशिन चौक), जुबेर पापा इनामदार (वय ३७, रा. इनामदार वाडा, कोंढवा) आणि अमीन मुसा पानसरे (वय २३, रा. चाँदतारा चौक, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रवी कचरू नागदिवे (वय ५०, रा. नेवसेमळा, देवाची उरुळी) यांचा सोमवारी (ता. २२) खून झाला होता. आरोपींनी केलेल्या हल्‍यात नागदिवे यांचा मित्र बालाजी चव्हाण गंभीर जखमी झाले आहेत.

नागदिवे हे उरुळी देवाची येथील एका शाळेत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. तर चव्हाण हे रिक्षाचालक आहेत. नागदिवे यांची ५३ वर्षाची मैत्रीण ही येवलेवाडी येथील एका जमिनीची देखभाल करते. डोंगराजवळ असलेल्या प्लॉटींगमध्ये तिचे घर आहे. नागदिवे हे तिला त्या ठिकाणी भेटण्यासाठी चव्हाण याच्या रिक्षात जात. त्यामुळे प्लॉटींगवर सुपरवायझर असलेल्या ऋषीकेश गायकवाडसह इतरांना नागदिवेचे संबंधित महिलेशी गैरसंबंध असून सार्इटवरील खोलीचा वापर गैरकृत्यासाठी करत असल्याचा त्यांना संशय होता. त्यातून नागदिवे आणि बालाजी यांना सुपरवायझरने भेटण्यासाठी येवलेवाडी येथील त्या प्लॉटच्या ठिकाणी बोलविले. तेथे दोघांना मारहाण करून डांबून ठेवले. त्यात नागदिवे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह व जखमी चव्हाणला रिक्षातून उंड्रीत सोडले. दरम्यान जखमी अवस्थेतील चव्हाणने नागरिकांच्या मदतीने घरी फोन करून घडलेला प्रकार सांगितला.

बालाजी यांचे दोन्ही हात तुटले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील, गुन्हे निरीक्षक गोकूळ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक स्वराज पाटील करीत आहेत.

loading image
go to top