पिंपरी: दापोडीत पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून 

संदीप घिसे
रविवार, 30 डिसेंबर 2018

अल्विन रवी राजगोपाल (वय १९ , रा. कैलास जाधव चाळ, जयभीमनगर, दापोडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. क्लेरा रॉबर्ट किट्टो आणि पुष्पा राजगोपाल अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. क्लेरा रॉबर्ट किट्टो यांनी याबाबत भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिंपरी : पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर कोयत्याने वार करत त्याचा खून केला. याशिवाय इतर दोघेजण जखमी झाले. ही घटना दापोडी येथे रविवारी पहाटे घडली.

अल्विन रवी राजगोपाल (वय १९ , रा. कैलास जाधव चाळ, जयभीमनगर, दापोडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. क्लेरा रॉबर्ट किट्टो आणि पुष्पा राजगोपाल अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. क्लेरा रॉबर्ट किट्टो यांनी याबाबत भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिषेक राजू चव्हाण (वय २६), रुपेश दिलीप संकपाळ (वय २०), राहुल वीर उर्फ पप्प्या (वय 2०), निखील (पूर्ण नाव माहित नाही. वय २१) सनी गजभीव (वय २०, सर्व रा. जयभीमनगर, दापोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. 

पोलीस निरीक्षक (गुन्हे) पांडुरंग गोफणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास आरोपींनी आपसात संगनमत करून, पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून अल्विन रवी राजगोपाल यांच्यावर कोयत्याने डोक्यात वार केले. तसेच पेव्हिंग ब्लॉक आणि दगडाने मारहाण करून त्याचा खून केला. तसेच त्या सोडविण्यासाठी आलेल्या क्लेरा रॉबर्ट किट्टो आणि पुष्पा राजगोपाल यांनाही मारहाण करून जखमी केले. याबाबत अधिक तपास भोसरी पोलिस करीत आहेत.

Web Title: murder in Pimpri

टॅग्स