
साकोरी येथे शुक्रवारी (ता.४) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जानकूबाई अर्जुन चोरे (वय - ६५ वर्षे) रा. साकोरी (चोरेमळा) या जेष्ठ महिलेस, परिसरातील बाह्मणमळा येथे भाड्याचे खोलीत राहण्यास असलेल्या एका परप्रांतीय व्यक्तीने सेंटरिंगच्या कामाला नेण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून घेऊन गेला. दरम्यान संबंधित जेष्ठ महिला सायंकाळी घरी न परतल्याने तिच्या नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध केली.
आळेफाटा(पुणे) : साकोरी (ता. जुन्नर) येथे शुक्रवारी (ता.४) सेंटरिंगच्या कामाला नेण्याच्या बहाण्याने नेऊन एका परप्रांतीय व्यक्तीने एका जेष्ठ महिलेचा डोक्यात तीक्ष्ण हत्याराने मारहाण करून खून केला तसेच संबंधित महिलेचे सुमारे ५ तोळे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला आहे. दरम्यान आळेफाटा पोलीस ठाण्यात संबंधित परप्रांतीय आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्याच्या सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, साकोरी येथे शुक्रवारी (ता.४) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जानकूबाई अर्जुन चोरे (वय - ६५ वर्षे) रा. साकोरी (चोरेमळा) या जेष्ठ महिलेस, परिसरातील बाह्मणमळा येथे भाड्याचे खोलीत राहण्यास असलेल्या एका परप्रांतीय व्यक्तीने सेंटरिंगच्या कामाला नेण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून घेऊन गेला. दरम्यान संबंधित जेष्ठ महिला सायंकाळी घरी न परतल्याने तिच्या नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध केली.
मैत्रिणींसाठी कायपण ! फिरायला घेऊन जाण्यासाठी चोरायचा महागड्या बाईक !
यावेळी संबंधित परप्रांतीय व्यक्ती राहात असलेल्या बाम्हणमळा येथील घराला बाहेरून कुलूप असल्याने संशय आल्याने पोलीसांना कळविण्यात आले. संबंधित घरात ' जानकूबाई अर्जुन चोरे (वय - ६५ वर्षे) रा. साकोरी या जेष्ठ महिलेचा मृतदेह आढळून आला असून, तिच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने मारहाण करून खून केल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच तिच्या अंगावरील सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने गायब असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात संबंधित परप्रांतीय आरोपी - अर्जुन शुभनारायण प्रसाद, सध्या रा. साकोरी (मूळ रा. खबशी, ता. बनीयापुर छप्रा, जि. सारंग - राज्य बिहार) याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद बापु पांडुरंग साळवे यांनी, आळेफाटा पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान पुढील तपास आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार करीत आहेत.