पुण्यात तरूणाचा कोयत्याने सपासप वार करून खून

0murder_93.jpg
0murder_93.jpg

पुणे : सिंहगड रस्त्यावरील फनटाइम चित्रपटगृहाशेजारी रविवारी भरदिवसा एका तरुणावर काही जणांनी धारदार शस्त्राने वार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.  या घटनेत जखमी झालेल्या तरुणास रुग्णलयात दाखल केले, मात्र त्याचा मृ्त्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. भरवस्तीत हा प्रकार घडल्याने परिसरामध्ये तणावाचे वातावरण होते.

रोहन रमेश सालवी (वय 27, रा. महादेवनगर, वडगाव बुदृक) असे जखमी असलेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी दुपारी साडे तीन वाजता फनटाइम चित्रपटगृहासमोर रोहनवर अज्ञात हल्लेखोरानी धारदार शस्त्राने वार केले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली.  दरम्यान, या प्रकाराबाबत नागरिकांनी सिंहगड पोलिसांना खबर दिली.

दरम्यान रोहनला उपचारासाठी ससुन रुग्णलयात हलविण्यात आले. त्यानंतर परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त मंगेश शिंदे, वरिष्ठ पोलिस अधिकारी सरदार पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगीता यादव घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळची पाहणी करुन परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यानंतर पोलिसांना तपासाबाबत मार्गदर्शन केले.

रोहनला उपचारासाठी ससुन रुग्णलयात दाखल केले. मात्र त्याच्या चेहऱ्यावर, डोक्यात धारदार शस्त्रने वार केल्यामुळे त्याची प्रकृती नाजुक असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com