धक्कादायक! पुण्यात रागाने पाहिले म्हणून तरुणाचा खून

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

अनिकेतवर मुंढवा पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल आहे. दरम्यान यातील संशयित शुभम व त्याचे एकमेकांकडे रागाने पाहन्यावरून सतत वाद होत होते.

पुणे : एकमेकांकडे रागाने पाहण्यावरून तरुणावर धारदार हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आला. ही घटना हडपसर भागात घडली आहे. अनिकेत घायतडक (वय 28, रा. मांजरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हल्लेखोरांचा पोलिस शोध घेत आहेत. घायतडक याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेतवर मुंढवा पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल आहे. दरम्यान यातील संशयित शुभम व त्याचे एकमेकांकडे रागाने पाहण्यावरून सतत वाद होत होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

शुक्रवारी मध्यरात्री काही कारणावरून त्यांचे वाद झाले. यानंतर चार ते पाच जणांच्या टोळक्याने मांजरी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात अनिकेतवर धारदार हत्याराने वार करून त्याचा खून केला. काही वेळाने हा प्रकार हडपसर पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a youth in Pune for giving Look in anger